Wednesday, 7 June 2017
मुरगूड विद्यालयाच्या मागासवर्गीय वसति- गृहात मोफत प्रवेशाचे आवाहन
मुरगुड प्रतिनिधी
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरच्या मुरगूड विद्यालय ज्युनियर काॅलेज मुरगूड ता कागल संचलित महात्मा गुरुकुल विद्यार्थी वसतिगृहामध्ये शैक्षणिक वर्ष सन 2017-18 साठी इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यतच्या गोरगरीब,होतकरू, आणि हुशार मागासवर्गीय विदयार्थाना मोफत प्रवेश देणात येणार आहे. सबंधित विद्यार्थी पालकांनी प्रत्यक्ष भेटून प्रवेश घेण्याचे आवाहन संस्थेचे संचालक प्राचार्य.पी.व्ही. शिंदे आणि वसतिगृह अधिक्षक निलेश शिंदे यांनी केले आहे.
अनुसुचित जमाती,विमुक्त व भटक्या जाती, विशेष व मागास व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय या प्रवर्गातील विदयार्थ्याना हा प्रवेश पूर्णपणे मोफत असून प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्याना मोफत भोजन व इतर सुविधा पुरवल्या जातात. प्रवेश मर्यादीत असल्याने इच्छुकानी कार्यालयीन वेळेमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्कासाठी ☎ (02325) 264342 या
क्रमांकावर मुरगुड विद्यालय येथे कार्यालयीन
वेळेत फोन करावा.
No comments :
Post a Comment