Powered by Blogger.

Wednesday, 26 July 2017

गणेशोत्सव डाँल्बी मुक्त व सामाजिक उपक्रम राबवून शांततेत साजरा करावा - स.पो.नि. परशुराम कांबळे

No comments :

हेरले/ प्रतिनिधी दि. २६/७/१७

आँगस्ट महिन्यात साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव डाँल्बी मुक्त व सामाजिक उपक्रम राबवून शांततेत साजरा करावा .असे आवाहन शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे स.पो.नि. परशुराम कांबळे यांनी केले. ते येथील कोल्हापूर स्टील सांस्कृतिक हाँलमध्ये आयोजित पदाधिकारी व तरूण मंडळांच्या मेळाव्यात बोलत होते .
ते पुढे म्हणाले , न्यायालयाच्या आदेशानुसार डाँल्बी मुक्त गणेशोत्सव यास आपले प्राधान्य असणार आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही. याची सर्वाँनी दक्षता घेतली पाहिजे . यास कोणी बाधा आणण्याचा प्रयत्न करू नये. तसेच अनावश्यक खर्चाला बगल देवून गोर गरिब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करावे . तसेच वृक्षारोपण , विविध प्रकारच्या स्पर्धा  घेऊन सामाजिक बांधिलकी जपावी . असे कांबळे यांनी सांगितले . तसेच गणेशोत्सव काळात कोणत्याही समाज किंवा धर्माच्या भावना दुखावतील असे कार्यक्रम करू नयेत अशी सुचना कांबळे यांनी दिली.
यावेळी उपसरपंच गोविंद घाटगे , महेश चव्हाण , राजेश पाटील , बापू पुजारी बाजीराव सातपुते आदींनी आपले विचार मांडले .
या मेळाव्यास डाँ. सुभाष पाटील , सलिम महात, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष सतिश पाटील , लियाकत गोलंदाज , सुरेश यादव , दिपक यादव , फौजदार शिरगुप्पे , विजय पाटील , यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

No comments :

Post a Comment