Thursday, 27 July 2017
एड्स नियंत्रण अशासकीय कर्मचाऱ्यांना आठ महिने पगार नाही कर्मचारी वर्ग व्हेंटिलेटरवर
हेरले/ प्रतिनिधी दि.२६/७/१७
राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था,नवी दिल्ली यांच्या कडून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई यांच्याकडे निधी वेळेवर न आल्याने महाराष्ट्र राज्यातील एच आय व्ही एड्स जनजागृती करणाऱ्या अशासकीय सामाजिक संस्थामधील
कर्मचा-यांचे डिसेंबर १६ ते जुले २०१७ या आठ महिन्याचे
पगार ( मानधन) वेळेवर झाले
नाही.त्यामुळे कर्मचारी वर्ग व्हेंटिलेटरवर आहे.
या संदर्भाचे निवेदन अशासकीय सामाजिक संस्थाच्या वतीने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकांच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर , विभागीय कार्यक्रम अधिकारी रमेश वर्धन यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात एच .आय. व्ही/ एड्स जनजागृती अभियान राबवण्यासाठी विविध अशासकीय संस्थांना निधी देण्यात येतो .पण माहे डिसेंबर २०१६ ते जुले २०१७ या आठ महिन्याचा निधी मिळाला नसल्याने कर्मचारी हवालदिल झाला आहे.
एड्स प्रतिबंध व नियंत्रण साठी अशासकीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण शी संलग्न आहेत.प्रत्येक संस्थेमध्ये प्रकल्प मॅनेजर, मूल्यमापन देखभाल अधिकारी, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ते,आरोग्य मित्र ,पिअर लीडर,हे कर्मचारी तसेच डॉक्टर,प्रकल्प संचालक हे मानधनवर कार्यरत आहेत.
या कर्मचारी वर्गाचे पगार वेळेवर झाले नाहीत .काही कर्मचारी हे नोकरी निमित्य गाव सोडून अशासकीय संस्थांच्या कार्यक्षेत्रात कुटूंबासह खोली भाड्याने घेऊन राहत आहेत .तर अनेकजण पार्टनर्शीप मध्ये रूम घेऊन राहत आहेत .त्यामुळे पगाराअभावी कौटूंबिक गरजा भागवणे, आजारपण, यासारख्या प्रश्नामुळे ग्रासून गेला आहे.जनजागृती अभियान राबविण्यासाठी प्रकल्पला निधी मिळतो या माध्यमातून एच. आय .व्ही/ एड्स जनजागृती होते. मोफत पथनाट्य, माहिती ,शिक्षण, संवाद, कंडोम प्रात्यक्षिक, समुपदेशन,मोफत आरोग्य शिबीर या उपक्रमव्दारे एड्स व गुप्तरोग विषयी मोफत मार्गदर्शन केले जाते.
या सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून मोफत एच. आय. व्ही तपासणी केली जाते.एच. आय. व्ही शून्यावर आणण्यासाठी प्रकल्प स्तरावर विविध कार्यक्रम राबविले जातात.
स्थंलातरीत कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प ,कोअर कांपोसाइट (देह विक्रय स्त्रिया,तृतीय पंथी ) ट्रॅकर्स टी आय ,लिंक वर्कर स्कीम या प्रकल्प अंतर्गत गुप्तरोग ,एच .आय. व्ही/ एड्स, लेंगिक समस्या या विषयी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग आरोग्य शिबीरातून जनजागृती करत आहे. एच .आय .व्ही संसर्गित लोकाची काळजी व त्यांना आधार देण्याबरोबर जोखमीच्या तृतीय पंथी, देहविक्रय स्त्रिया ,एमएसएम, डीडी, कोथी, पंणती या घटकाला मोफत मार्गदर्शन करण्यात येते.
सामान्य व्यक्ती एच.आय.व्ही व गुप्तरोगाच्या जाळ्यात अडकले जाऊ नयेत म्हणून कामगार वर्ग सातत्याने याविषयी जनजागृती करत आहे.सामाजिक बांधिलकी डोळ्यापुढे ठेऊन सामान्य लोकांना एड्स या रोगाची लागण होऊ नये म्हणून मोफत आरोग्य सेवा देत आहे.एच. आय. व्ही /एड्स व गुप्तरोगाचा विळखा कमी करण्यासाठी कामगार वर्ग मार्गदर्शन करत आहे. एम्सँक्स मुंबई या विभागाने दखल घेऊन प्रकल्पाच्या माध्यमातून एच. आय व्ही, गुप्तरोग,एड्स,क्षयरोग या विषयी मोफत माहिती देणाऱ्या कर्मचार्याच्यावर आलेली उपासमार थांबवण्यासाठी अनुदान त्वरित अदा करावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.या निवेदनावर प्रकल्प संचालक जी .एन .सलाती, प्रोजेक्ट मॅनेजर मोहन सातपुते, योगेश शिंदे, महेंद्र कांबळे, पिराजी तोडकर ,अमित गायकवाड, यांच्या सह्या आहेत.
फोटो :- अशासकीय सामाजिक संस्थाचे आठ महिन्यापासून अनुदान न आल्याने कर्मचाऱ्यांची उपासमार होत आहे यासंदर्भात अनुदान वेळेवर मिळावे यासाठीचे निवेदन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकांच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर, विभागीय कार्यक्रम अधिकारी रमेश वर्धन, प्रकल्प संचालक जी .एन .सलाती,प्रोजेक्ट मॅनेजर मोहन सातपुते,योगेश शिंदे,महेंद्र कांबळे, पिराजी तोडकर,अमित गायकवाड,आदी
No comments :
Post a Comment