Tuesday, 25 July 2017
विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या विचारांचा जागर करणे हीच त्यांना श्रद्धांजली - उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे
सिद्धनेर्ली ता २४; रवींद्र पाटील
विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या विचारांचा जागर करणे हीच त्यांना श्रद्धांजली आहे असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी केले.बामणी ता कागल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन वेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते .कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संजय भांबुरे यांनी या शिबिराचे उदघाटन केले.शाहू कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंहराजे घाटगे यांची जयंती व कागल बैंकेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त या शिबिराचे कागल बैंक व माधवबाग यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन केले होते .विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या प्रतिमेचे पुजन घोरपडे यांनी केले.दोनशेहून अधिक जणांची तपासणी यावेळी केली.यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कागल तालुका उपाध्यक्षपदी निवडी बद्दल कृष्णात मगदूम यांचा सत्कार कागल बैंकेचे अध्यक्ष एम पी पाटील यांनी केला .यावेळी बैंकेचे उपाध्यक्ष चंदर गाडीवड्ड सरपंच अर्चना पाटील उपसरपंच कमल माने शिवाजी मगदूम मोहन कांबळे बादशहा मुजावर अशोक पाटील कृष्णात बाबर ज्ञानदेव तारदाळे हरी चौगुले सुभाष कोईगडे आदी उपस्थित होते .स्वागत एम पी पाटील यांनी केले.आभार प्रकाश पाटील यांनी मानले.
छायाचित्र - बामणी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन वेळी शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे पोलीस निरीक्षक संजय भांबुरे एम पी पाटील व इतर
No comments :
Post a Comment