Powered by Blogger.

Sunday, 23 July 2017

"ज्ञानरचनावाद काळाची गरज."-अजितकुमार पाटील.

No comments :

प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिकेच्या, राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र11,कसबा बावडा, कोल्हापूर मध्ये  "ज्ञानरचनावाद" या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.कार्यशाळेचे उदघाटन केंद्र मुख्याध्यापक  अजितकुमार पाटील यांच्या हस्ते व दत्तात्रय डांगरे,मंगेश शेळके,जोतिबा बामणे,उपस्थितीत सरस्वती पुजन व दीपप्रज्वलन झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक अजितकुमार पाटील होते. ज्ञानरचनावाद" या विषयावर "मनोगतामध्ये,"शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानरचनावाद सुलभतेने व त्यांच्या कला गुणांचा वापर करून शिकवले तरच विद्यार्थ्यांना नवीन कौशल्येे आत्मसात होणार आहेत.ज्ञानरचनावाद काळाची गरज आहे.असे प्रतिपादन केले.
ज्ञानरचनावाद या विषयावरील कार्यशाळेमध्ये कसबा बावडा, समूह साधन केंद 7 मधील
40 शिक्षक व शिक्षिका, मुख्यध्यापक सहभागी होते.तज्ञ मार्गदर्शक एस डी पाटील,आशा पाटील यांनी मार्गदर्शन केले.कार्यशाळेत मराठी,गणित,विज्ञान,इंग्रजी,इतिहास,या विषयावर शैक्षणिक साहित्य तयार करण्यात आले. प्रदिप पाटील,श्रीकांत पाटील,शहाजी पाटील,वैशाली पाटील,सोनाली मोरे,जे बी सपाटे,सुनीता आंबर्डेकर,सुजाता आवटी,आदींनी शैक्षणिक साहित्य वापर कसे करावे याचे प्रात्यक्षिक सादर केले. सुशील जाधव यांनी सूत्रसंचालन केले,स्वागत उत्तम कुंभार  तर सातापा पाटील यांनी ज्ञानरचनावाद कार्यशाळेचे उदिष्ट व हेतू स्पष्ट केला.ज्ञानरचनावाद या विषयावरील कार्यशाळेस हेमंतकुमार पाटोळे,अरुण सूनगार,मंगल मोरे,सहदेव शिंदे,संभाजी कुंभार,रवी पाटील, शिवशंभू गाटे,आसमा तांबोळी, नितीन गभाले,सुनील पोसुगडे,यांनी विशेष सहकार्य केले.कार्यशाळेचे आभार वैशाली पाटील यांनी मानले.

No comments :

Post a Comment