Friday, 7 July 2017
श्री सदगुरू निरंजन महाराज आश्रमामध्ये गुरूपौर्णिमा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
हेरले/ प्रतिनिधी दि. ७/७/१७
हातकणंगले तालूक्यातील मौजे वडगांव येथील श्री सदगुरू निरंजन महाराज आश्रमामध्ये रविवारी दि. ९ जुलै रोजी व्यासपूजा (गुरूपौर्णिमा) निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सुर्योदय -६.८ वा. श्रींचे पादुकांना अभिषेक, सकाळी ८ते ९वा. नोंदणी व चहापान , सकाळी ९ते ११ वा. श्री भजनी मंडळ हेरलेचे भजन, सकाळी ११ते १२वा. प्रवचन नारायण एकलमहाराज (जोगेवाडी), दुपारी १२.३०ते १ वा. श्रींचे पादुकांना बेल व फुले अर्पण, १ते ३वा. महाप्रसाद वाटप, दुपारी ३ते ५.३०वा. भजन श्री शिवपाल बनछोडे व पांडुरंग सुतार ( कोल्हापूर), सायंकाळी ६ ते ७.३० प्रवचन प्रशांत सरनाईक ( कोल्हापूर) व सूर्यास्त व आरती होईल. कोल्हापूर जिल्ह्यातील श्री सदगुरू निरंजन भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सदगुरू निरंजन महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments :
Post a Comment