Powered by Blogger.

Tuesday, 1 August 2017

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न

No comments :

हेरले/ प्रतिनिधी दि. १/८/१७                                                        हेरले परिसरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त सकाळी कार्यकर्त्यांनी जयघोष करीत मोटर सायकल रॅली गावातील प्रमुख मार्गावरून काढली. त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विविध उपक्रमांनी जयंती मोठया उत्साहात साजरी झाली.
     मौजे वडगांव येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न झाली. प्रथम लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन समाज मंदिर मध्ये करण्यात आले .याचबरोबर डॉ . बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्या देखील प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. . यावेळी सरपंच सतीश चौगुले, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबरे, माजी चेअरमन संजय चौगुले, उदय चौगुले
तज्ञ संचालक किरण चौगुले, अवधूत मुसळे,  गौतम तराळ, , काशीनाथ कांबळे,  अनंत जाधव मातंग समाजाचे गणपती भोरे, निशिकांत भोरे, संजय सकटे, शांतीलाल कांबळे, नदीम हजारी, दादा भोरे, सागर सकटे, नंदू भंडारे, आशोक लोंढे, त्याचबरोबर समाजातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
       कार्यक्रमात प्रकाश कांबरे, सतीश चौगुले, किरण चौगुले, अवधूत मुसळे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक संतोष लोढे यांनी तर आभार  सेक्रेटरी रमेश लोंढे यांनी मानले.

No comments :

Post a Comment