Wednesday, 2 August 2017
" राजर्षी शाहू विद्यामंदिरमध्ये महापुरुषांना अभिवादन प्रसंगी 'एक राखी सीमेवरील जवानासाठी उपक्रम' उत्साहात संपन्न "
कोल्हापूर प्रतिनिधी दि.१ ऑगस्ट :
कसबा बावडा परिसरातील महानगरपालिकेची उपक्रमशील शाळा राजर्षी शाहू विद्यामंदिरमध्ये महापुरुष अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त बालमनावर सुसंस्कार व्हावेत या उद्देशाने " एक राखी सीमेवरील जवानासाठी "विशेष उपक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी करणेत आले.
यामध्ये प्रथमतः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला मा. मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या कार्यकर्तुत्वपर भाषणे सादर करून महापुरुषांच्या विचाराना व आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला.
तसेच सदर प्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कार व देशप्रेम निर्माण व्हावे म्हणून सीमेवरील जवानांसाठी शाळेच्या विद्यार्थीनीनी राखी तयार करण्याच्या कार्यशाळेत उत्साहाने सहभाग घेऊन आकर्षक राख्या तयार केल्या. सदर कार्यशाळेचे नेतृत्व शाळेच्या महिला शिक्षिका प्राजक्ता कुलकर्णी, सुजाता आवटी ,आसमा तांबोळी यांनी केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री.अजितकुमार पाटील सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्राजक्ता शिंदे मॅडम,उपाध्यक्षा पल्लवी पाटील,सदस्य सुतार साहेब,कोरवी मॅडम,जेष्ठ शिक्षक उत्तम कुंभार, जयश्री सपाटे , सुशील जाधव, अरुण सुनगार, अपंग समावेशीत शिक्षक राज अप्पूगडे सर , बालवाडी शिक्षिका कल्पना पाटील मॅडम,प्रभावळे मॅडम, सेवक हेमंत पाटोळे ,मंगल मोरे तसेच भागातील पालक,जेष्ठ नागरिक ,सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
very nice
ReplyDelete