Thursday, 10 August 2017
क||बावड्यात रा.शाहू विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांकडून स्वाईन फ्लू जनजागृती
कसबा बावडा प्रतिनिधी
" स्वाईन फ्लू" चा वाढता धोका लक्षात घेऊन विद्यार्थी, पालक, भागातील नागरिक यांच्यामध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून मनपा.राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.11 या शाळेच्या वतीने 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये व कसबा बावडा परिसरातील भगवा चौक,भगतसिंग वसाहत , माळगल्ली आदी परिसरात " "स्वाईन फ्लू आधारित जनजागृती रॅली " काढणेत आली तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी ' पथनाट्य ' सादर केले. त्यात श्रद्धा दाभाडे, मालन बंडेनवाज, मृणाल दाभाडे आदी मुलींनी यात पुढाकार घेतला.
" सदर प्रसंगी स्वच्छतेची साथ धरू, स्वाईन फ्लू वर मात करू" आशा घोषणा देण्यात आल्या.
सदर जनजागृती रॅलीचे उदघाटन भागाच्या नगरसेविका माधुरी लाड यांच्या हस्ते करणेत आले.सदर प्रसंगी पर्यवेक्षिका उषा सरदेसाई मॅडम , नगरसेवक श्रावण फडतारे व सामाजिक कार्यकर्त्यांनी रॅलीला हार्दिक शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.अजितकुमार पाटील सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्राजक्ता शिंदे ,भारतवीर मित्र मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते , फायर स्टेशन पदाधिकारी कर्मचारी , आरोग्यनिरीक्षक नंदकुमार पाटील,उपाध्यक्षा पल्लवी पाटील,सदस्य सुतार ,कोरवी ,जेष्ठ शिक्षक उत्तम कुंभार, जयश्री सपाटे , सुजाता आवटी , अरुण सुनगार, प्राजक्ता कुलकर्णी,शिवशंभू गाटे,आसमा तांबोळी ,राज अप्पूगडे , बालवाडी शिक्षिका कल्पना पाटील ,प्रभावळे , सेवक हेमंत पाटोळे ,मंगल मोरे तसेच भागातील पालक,जेष्ठ नागरिक ,सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर उपक्रमाचे कौतुक संपूर्ण भागातील नागरिक करत आहेत व स्वाईन फ्लू बद्दल जनजागृती केल्याबद्दल धन्यवाद देत आहेत.
No comments :
Post a Comment