Powered by Blogger.

Wednesday, 9 August 2017

कणेरी सिद्धगिरी हॉस्पीटल जनआरोग्य योजनेअंर्तगत रुकडी आरोग्य केंद्र येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

No comments :

हेर्ले/ वार्ताहर दि. ९/८/१७                                                     कणेरी सिद्धगिरी हॉस्पीटल  महात्मा फुले जीवनदायी जनआरोग्य योजनेअंर्तगत रुकडी आरोग्य केंद्र येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले . अशी माहिती प्रसिद्धीस राजेंद्र मकोटे यांनी दिली.
     सिध्दगिरी  हॉस्पीटल - रिचर्स सेंटर वतीने आयोजित या शिबीराचा लाभ रुकडी सह नागांव , हेर्ले , तिळवणी, साजणी , अतिग्रे सह पंचक्रोशीतील १३४ रुग्ण व्यक्तीनी घेतला . त्यांची आरोग्य तपासणी सिद्धगिरी चे डॉक्टर स्वप्नील जाधव आणि डॉ . वैशाली फुले यांनी करुन त्यांना औषधे देणेत आली . तसेच १४ रुग्णाना पुढील उपचारासाठी सिध्दगिरी हॉस्पीटल मध्ये येणेस सांगण्यात आले .
     या वेळी रुकडी संरपंच मिनाक्षी राजेश अपराध यांनी सदिच्छा भेट दिली , त्यांचे तसेच आरोग्य अधिकारी डॉ . डी . एस . कात्री व औषध निर्माण अधिकारी  हेमंत मोरे यांचे स्वागत पुष्पगुच्छ आणि सिद्धगिरी मठ माहिती पुस्तिका देऊन डॉ़ . जाधव व डॉ . फुले यांनी केले . या उपक्रमास कोल्हापूर जिल्हा पत्रकार संघाचे मधुकर वायदंडे तसेच आशा व रुकडी ग्रामपचायंती चे सहकार्य लाभले . यांचे नियोजन सिध्दगिरी हॉस्पीटल जनसंपर्क विभागाचे कृष्णा वरुटे व राजेंद्र मकोटे यांनी केले . शेवटी आरोग्य  अधिकारी दिवाळी  नंतर सिध्दगिरी वतीने महिला व युवती साठी आरोग्य जागृती व्याख्यान व शिबीर आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली .
          फोटो - रूकडी येथे डॉ. टी.एस. कात्री यांना माहिती पुस्तिका प्रधान करतांना राजेंद्र मकोटे.

No comments :

Post a Comment