Powered by Blogger.

Wednesday, 9 August 2017

महालक्ष्मी रिशेलर्स आणि कामगार युनियन यांच्यामध्ये वेतनवाढीचा ३ वर्षासाठीचा करार, ५००० रू अशी पगार वाढ

No comments :

हेर्ले/ वार्ताहर दि. ९/८/१७
महालक्ष्मी रिशेलर्स गोकुळ शिरगांव आणि मेकॅनिकल अॅण्ड इंजिनिअरिग कामगार युनियन कोल्हापूर, श्रमिक शिरोली यांच्यामध्ये वेतनवाढीचा ३ वर्षासाठीचा करारावर नुकत्याच व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात सह्या करार झाला.
      यामध्ये कामगारांना ३ वर्षासाठी ५००० रू अशी पगार वाढ देण्यात आली, सदरची वाढ ही संपूर्ण हातामध्ये मिळणारी वाढ असुन यामध्ये कोणत्याही प्रकारची कपात नसुन सर्व रक्कम कामगारांना हातात मिळणारी असुन यापैकी मुळपगार मध्ये ३५०० रु वाढ व १५०० रू ही इतर भत्यात वाढ केली असून सदरची वाढ ही चांगल्या पद्धतीने झाल्याने कामगार व व्यवस्थापन समाधानी असुन त्याच बरोबर बोनसचाही १७ % वाढीचा करार झाला.  या शिवाय करार काळात ३ रजेसह सहल , व शासन जो दर सहामाही महागाई भत्ता जाहीर करत त्याच्या
दिडपट  महागाई भत्ता देणेचे ठरले.
     व्यवस्थापना तर्फे डायरेक्टर अरूण शंकरराव चौगुले, सिनीअर मार्केटींग मॅनेजर आर.एस. वाणी व गुरूप्रसाद विलासराव घोरपडे तर कामगार संघटने तर्फे जनरल सेक्रेटरी कॉ . प्रकाश कांबरे, कामगार प्रतिनिधी, सुनिल दादासो पाटील,  नरेंद्र लक्ष्मण मोरे, व शिवाजी पुंडलिक नलवडे यांच्या सहया झाल्या सदर च्या कराराची अंमलबजावणी १ एप्रिल २०१७ पासून करणेचे एकमताने ठरले.
     फोटो- मॅनेजर आर.एस. वाणी जनरल सेक्रेटरी प्रकाश कांबरे करार प्रदान करतांना शेजारी सुनिल पाटील, नरेंद्र माने, शिवाजी नलवडे आदी मान्यवर.

No comments :

Post a Comment