Powered by Blogger.

Tuesday, 8 August 2017

यंदा कर्तव्य विवाह दिवाळी अंकासाठी कथा स्पर्धा

No comments :

कोल्हापूर प्रतिनिधी

नवोदित आणि हौशी कथा लेखकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी  "यंदा कर्तव्य विवाह" या विवाहविषयक दिवाळी अंकातर्फे 'विवाह' या विषयास अनुसरून १५०० ते २००० शब्दात  कथा लिहून पाठवायची आहे. (कथा 'विवाह' या आशयावर वाचकांसाठी रंजक, बोधक अपेक्षित आहे.)

स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांच्या कथेबरोबर स्पर्धेसाठी आलेल्या काही उल्लेखनीय निवडक कथांचा "यंदा कर्तव्य विवाह"च्या २०१७ च्या दिवाळी अंकात समावेश करण्यात येणार आहे.

तसेच या स्पर्धेतील विजेत्यांना "स्व. प्रा.शरद वराडकर स्मृती प्रतिष्ठान" तर्फे रोख पारितोषिक आणि स्मृती चिन्ह देऊन सन्मानित केले जाणार आहे. या स्पर्धेसाठी कथा, 

'यंदा कर्तव्य विवाह'
द्वारा:कोकण मित्र मंडळ, चंद्रगंगा अपार्टमेंट, शाहूपुरी २री गल्ली, कोल्हापूर -१. 

या पत्त्यावर १० सप्टेंबर २०१७ पूर्वी रजि.पोस्ट किंवा कुरियरने किंवा इमेलने ykvmkkolhapur@gmail.com वर पाठवाव्यात.
मेलवर पाठवताना हस्तलिखित साहित्याची स्कॅन कॉपी पाठवावी. 
स्पर्धेची कथा आपल्या हस्तलिखितातच  A4 साईज कागदाच्या एकाच बाजूवर लिहून पाठवायची आहे. आणि सोबत लेखकाने स्वतःचा एक रंगीत फोटो, पूर्ण पोस्टल ऍड्रेस आणि फोन नंबर याचा उल्लेख करावा. 
सोबत कथा स्वतः लिहिल्याचे सेल्फ डिक्लेरेशन सोबत जोडणे आवश्यक. 
आमचेकडे कथा पाठवताना  पाकिटावर स्पष्टपणे "यंदा कर्तव्य विवाह कथा स्पर्धा" असा उल्लेख असावा. 

अधिक माहितीसाठी अजयराज वराडकर- मो.९८२२३९२५२१ या नंबरवर संपर्क साधावा.

No comments :

Post a Comment