Sunday, 6 August 2017
मलकारसिद्ध मंदिर परिसरात वृक्षारोपण...
प्रतिनिधी सतिश लोहार
शिवनाकवाडी माणकापूर चे दैवत मलकारसिध्द मंदीर परिसरात आज अनेक प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आले , दरवर्षी या ठिकाणी मोठया प्रमाणात वृक्ष लागवड केली जाते शिवनाकवाडी, माणकापुर गावातील नागरिक , भक्त , पुजारी , पर्यावरण प्रेमी वृक्ष जतन करण्यासाठी मोलाचे योगदान देतात आज संकेश्वर जवळील हत्तरगी गावातील काही ग्रामस्थ मंडळींनी दरवर्षी प्रमाणे वृक्षारोपण या ठिकाणी केले , ते खूप मोठे काम करत आहेत , आज जगात प्रदूषण , जागतिक तापमान वाढ यासारख्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत प्रत्येकाने जर ठरविले एक झाड मी लावणार व ते जतन करणार तर नक्कीच आपण भविष्यात सुंदर पर्यावरणाचा चांगला आस्वाद घेऊ शकणार , स्वछ प्राणवायू आपल्याला मिळेल . आज गरज आहे वृक्षारोपण करुन ते रोप जिवंत ठेवण्याची .......
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment