Sunday, 6 August 2017
चिकुर्डे (ता. वाळवा ) येथे चौदाव्या वित्तआयोगातून सुसज्य असे बसस्टॉपचे भूमिपूजन
चिकुर्डे (ता. वाळवा ) प्रतिनिधी
येथे चौदाव्या वित्त आयोगातून सुसज्य असे बसस्टॉपचे भूमिपूजन सरपंच कृष्णात पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील म्हणाले कि शिक्षणासाठी वारणानगर इस्लामपूरला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने त्यांना पास साठी इस्लामपूर किंवा कोडोलीला जावे लागत आहे त्यामुळे त्यांचा वेळ वाया जात असून त्यांचा तो त्रास कमी करण्यासाठी आम्ही या नवीन बस स्टॉप मध्ये पासची सोय करणार आहे व चालक वाहक याना विश्रांतीगृहाचि सोय करण्यात येणार आहे या साठी 7लाख 32हजार रूपये खर्च येणार असल्याचे सांगितले.यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या दोनी बाजूच्या काँक्रिट भिंतीच्या बांधकाम भूमिपूजन सुद्धा करण्यात आले यासाठी 3लाख 63हजार रुपये खर्च येणार आहे यावेळी चिकुर्डे विकास सोसायटी चे चेअरमन दगडू पाटील.व्हाइसचेअरमन प्रताप भोसले, श्रीनिवास पाटील, माजी चेअरमन बाबासो खोत व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
No comments :
Post a Comment