Sunday, 6 August 2017
रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या मैत्रेय या इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहात साजरा
हेर्ले/ वार्ताहर दिनांक: ६/८/१७
रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या मैत्रेय या इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ कोल्हापूर पब्लिक स्कुल मध्येे उत्साहात साजरा करण्यात आला.
मैत्रेय हा इंटरॅक्ट क्लब, कोल्हापूर पुब्लिक स्कूल येथे ७ वर्षापूर्वी स्थापन झाला. आतापर्यंत मैत्रेयच्या सदस्यांनी शाळेतील अभ्यासा बरोबरच समाजसेवेसाठी अनेक उपक्रम केले आहेत. या कार्यक्रमा निमित्त प्रमुख पाहूणे म्हणून आरडीसी इंटरॅक्ट रोटेरीअन हरेश पटेल, रोटरीचे पदाधिकारी एजी रोटेरीअन दिलीप शेवाळे, शाळेच्या संस्थापिका शोभा तावडे, रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या अध्याक्षा विशाखा आपटे, सचिव गौरी शिरगावकर व शाळेच्या मुख्याधापिका शुभांगी पवार उपस्थित होते.
या कार्यक्रमात यावर्षीचे नवीन अध्यक्ष सार्थक गुंदेषा व सचिव सिद्धी पाटील यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष रीभाव जाधव व सचिव तनया भात यांनी वर्षभारत केलेल्या कार्याचा आढावा मांडला. यामध्ये स्वयं मतीमंद मुलांच्या शाळेत, मुलांना चित्रकला, विविध खेळ व नृत्य असे अनेक कार्यक्रम आयोजीत केले. याचबरोबर त्यांच्या कडून आकाशकंदील, गणेशमुर्ती, कापडी फुले तयार अशा अनेक वस्तूंचे प्रशिक्षण दिले. याबरोबर नवरात्रीत महालक्ष्मी मंदिर स्वच्छता व रांगेचे नियोजन, तसेच पल्स पोलिओबद्दल माहिती, वैयक्तिक स्वच्छता, गणेशविसर्जन कचरा संकलन, जवानांसाठी रक्षाबंधन, अशा अनेक कार्यक्रमात भाग घेतला. या विविध कार्याचा आढावा घेऊन या क्लबला जिल्हा पातळीवर बेस्ट इंटरॅक्ट क्लब, बेस्ट इंटरॅक्ट शिक्षक, बेस्ट नृत्य सादरीकरण व बेस्ट विदेओ सादरीकरण असे चार पारीतोषक मिळाले.
रोटरी क्लब ऑफ गर्गीजच्या अध्यक्षा विशाखा आपटे यांनी आव्हान केले कि पुढील वर्षभरात वृद्धांशी मैत्री हा कार्यक्रम घ्यावा. या साठी रोटरी क्लब द्वारे कोल्हापूर पब्लिक स्कूल च्या मुलांना फ्रेन्डशिप बँड़ म्हणून मतीमंद मुलांनी केलेल्या राख्या दिल्या, तसेच व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा घ्यावी असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
फोटो - पब्लिक स्कूलमध्ये पदग्रहण प्रसंगी विदयार्थी व रोटरी क्लब ऑफ गार्गिजचे पदाधिकारीसह सचिव गौरी शिरगावकर
No comments :
Post a Comment