Powered by Blogger.

Saturday, 5 August 2017

हा पुरस्कार आपल्या सर्वांचा आहे : निकेत पावसकर ग्रामीण पत्रकारांच्यावतीने विशेष सत्कार कार्यक्रमात प्रतिपादन

No comments :

नांदगाव : वार्ताहर-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुका पत्रकार संघाकडून देण्यात येणारा उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुरस्कार प्राप्त दै.लोकमतचे निकेत पावसकर यांचा नांदगाव,तरेळे ग्रामीण पत्रकार व मित्रपरिवारांडून नांदगाव येथे भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी नांदगाव - तळेरे विभागातील पत्रकार मित्र, हितचिंतक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कणकवली तालुका पत्रकार संघाकडून यावर्षीपासून प्रथमच पत्रकारांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी पहिलाच ग्रामीण पत्रकार पुरस्कार दै.लोकमतचे नांदगाव प्रतिनिधी निकेत पावसकर यांना विविध मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

यानिमित्त नांदगाव, तळेरे येथील पत्रकार मित्रांनी हा सत्कार आयोजित केला होता. यावेळी बोलताना निकेत पावसकर म्हणाले की, हा पुरस्कार मी माझ्या कणकवली तालुक्यातील सर्व ग्रामीण पत्रकारांच्यावतीने प्रातीनिधीक स्वरूपात स्वीकारला अाहे. हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून नांदगाव, तळेरे येथील माझ्या सर्व पत्रकार मित्रांचा आहे. फक्त तुम्हा सर्वाचा प्रतिनिधी म्हणून मी तो स्विकारला. मी बातमीदारी करीत असलो तरीदेखील त्यामागे अनेकांचे सहकार्य असते.

यावेळी असलदे उपसरपंच पंढरी वायंगणकर, सुभाष बिडये, आदम साठविलकर, जाफर कुणकेरकर, तालुका पत्रकार संघाचे सदस्य तथा पत्रकार उत्तम सावंत, पत्रकार सचिन राणे, पत्रकार गुरूप्रसाद सावंत, पत्रकार ऋषिकेश मोरजकर, योगेश सदडेकर, पंकज गावकर, ज्ञानेश्वर गवस, मिलिंद सावंत, प्रथमेश लाड, रामक्रुष्ण गोसावी, संदिप पाटिल, स्वप्निल हिरनवाळे आदि मित्र परिवार उपस्थित होते.

यावेळी निकेत पावसकर यांना पुष्पगुच्छ, फुलझाड व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वानी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋषीकेश मोरजकर तर आभार उत्तम सावंत यांनी मानले.

फोटो : निकेत पावसकर यांचा सत्कार करता नांदगाव तळेरे येथील ग्रामीण पत्रकार व मित्रमंडळ.

छाया.अक्षरा फोटो नांदगाव.

No comments :

Post a Comment