Sunday, 20 August 2017
कुरळप पोलीस स्टेशनच्या वतीने एकविस गावातील गणेश मंडळाची मिटिंग
प्रतिनिधी - दिलीप मोहिते
सांगली जिल्हा वाळवा तालुक्यातील कुरळप पोलीस स्टेशनच्या वतीने एकविस गावातील गणेश मंडळाची मिटिंग घेण्यात आली या वेळी अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी सर्व मंडळांनी डॉल्बी मुक्त उत्सव साजरा करून रक्त दान, गरजूना हेल्मेट वाटणे व जलयुक्त शिवारासाठी मदत करावी तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिस च्या मुर्त्या वापरू नये त्यामुळे नदीतील मासे मरतात तर मुर्त्यांचे विघटन लवकर होत नाही त्यामुळे मूर्तीचे विटंबन होते यावेळी पोलीस उपअधीक्षक किशोर काळे म्हणाले कि कायदा व सुव्यवस्था राखून उत्सव साजरा करावा कुरळप स.पो.नि.विवेक पाटील यांनी सांगितले कि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक कार्यकर्ता मंडपाजवळ ठेवावा ऍम्ब्युलन्स जाईल अशी रस्ता सोडून मंडप घालावा या वेळी मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
No comments :
Post a Comment