Tuesday, 22 August 2017
स्वा.शेतकरी संघटनेच्या पाठीशी सर्वसामान्य, गरीब, शेतकरी असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीची काळजी नाही - खा.राजू शेट्टी
हेर्ले/ वार्ताहर दि. २२/८/१७
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठीशी सर्वसामान्य, गरीब, शेतकरी असल्याने पुढील होणाऱ्या लोकसभा निवडणूकीची काळजी नाही. असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. ते हेरले ( ता. हातकणंगले) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित८२ लाखांचा भव्य शुभारंभ व सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच बालेचाँद जमादार होते.
खास. शेट्टी पुढे म्हणाले की स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून कोणी आले गेलेने काहीही फरक पडत नाही. अन्याया विरूद्ध लढा सातत्याने दिला जातो, त्यामुळे शेतकरी चळवळीत बाधा येणार नाही.समाजातील सर्व कष्टकरी घटक पाठीशी असल्याने संघटनेची पाळेमुळे घट्ट आहेत.
माजी सभापती राजेश पाटील म्हणाले की बलशाली आत्मक्लेष यात्रा पूर्ण झाले नंतर तात्काळ आठ दिवसात शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी निर्णय घेतला. याचे सर्व श्रेय खासदार राजू शेट्टी यांना जाते. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये स्वाभिमानी, शिवसेना,आवाडे गट अशी महायुती होऊन निवडणूक लढविली जाईल.
सरपंच बालेचाँद जमादार म्हणाले की गावात या महायुतीने प्रचंड विकासकामे केली आहेत. जनतेने आमच्यावर टाकलेल्या विश्वास साजेल असे कार्य केले आहे आणि पुढेही केले जाईल. खासदार राजू शेट्टी यांच्या विचाराशी सदैव पाठीशी व साथ असेल.
प्रथमतः खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते महिला व बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे, जि.प. सदस्या डॉ. पदमाराणी पाटील, पं.स. सदस्या महेरनिगा जमादार, माजी समाजकल्याण सभापती किरण कांबळे, माजी सभापती राजेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी उपसरपंच संदिप चौगुले, प्रा.राजगोंड पाटील, अशोक मुंडे, मुनिर जमादार कपिल भोसले, उदय चौगुले, शशिकांत पाटील, सुनिल खोचगे,आदी मान्यवरांसह ग्रामपंचायत सदस्य, संघटनेचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेश चौगुले यांनी केले.
फोटो - हेरले येथे खा. राजू शेट्टी बोलतांना शेजारी राजेश पाटील, डॉ. पद्माराणी पाटील, महेरनिगा जमादार,बालेचाँद जमादार आदी
No comments :
Post a Comment