Powered by Blogger.

Wednesday, 23 August 2017

दिव्यांग अनूदान त्वरीत वितरीत न केल्यास निषेध फेरी,आमरण उपोषणचा ईशारा. कागल तालूका अपंग असोशिएशन ची निवेदनद्वारे मागणी

No comments :

मुरगुड प्रतिनिधी
      कागल तालूका अपंग ( दिव्यांग ) असोशिएशनच्या वतीने मुरगुड शहरातील दिव्यांग नागरिकांच्या  कडून महसूल वर्ष 2016 व 17 मधील एकूण महसुलाच्या तीन टक्के रकमेचे थकीत अनुदान त्वरित वितरित  करण्याची मागणी  केली. ३१ आॕगस्ट पर्यत अनूदान न मिळाल्यास मुरगुड शहरातून निषेध फेरी, व आमरण उपोषण करु असा ईशारा दिला आहे. आशयाचे निवेदन मुख्याधिकारी यांना दिले. मुख्याधिकारी यांच्यावतीने श्री.शशिकांत मोहीते यांनी हे निवेदन स्विकारले.
  निवेदनाचा आशय आणी करण्यात आलेल्या मागण्या अशा ,कागल तालूका अपंग ( दिव्यांग )असोशिएशनच्यावतिने १०५ दिव्यांगासाठी अनूदानाबदल आपल्या नगरपरिषदेकडे ३१ मार्च २०१७ पूर्वी अर्ज दाखल केले आहेत. पाच महिन्याच्या कालावधी नंतरही कांहीही कारवाई झालेली दिसून येत नाही. याबाबत आमदार हसन मूश्रीफ ,नगराध्यक्ष ,उपनगराध्यक्ष ,सर्व नगरसेवक तसेच तत्कालीन मूख्याधिकारी टिना गवळी यांना प्रत्यक्ष भेटुन चर्चा केली होती.तरीही अनूदान देणेस विलब होत आहे.३१ ऑगस्ट प्रयत्न आमचे अनूदान आमच्या खात्यातवर जमा व्हावे अन्यथा आम्ही निषेध फेरी,उपोषण सारखे आंदोलनाचे अस्त्र हाती घेऊ असा इशारा दिला आहे.
    या निवेदनाद्वारे १एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ वसूल महसूलावर मिळणारे तीन टक्के अनूदान त्वरीत मिळावे,अपंगाना घरफाळ्यात ५० टक्के  सवलत मिळावी,व्यवसायासाठी केबीन व जागा उपलब्ध करून द्याव्यात.अपंगासाठी येणारे जिआर पालिका कार्यालयात  नोटीस बोर्डवर बाहेर लावावेत. सरपिराजीराव तलाव  नागरिकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे प्रदूषित होत आहे,  अंघोळीसाठी, वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर होत असून प्रचंड प्रदूषण वाढले आहे. वारंवार विनंत्या करूनही नागरिक हलगर्जी करत आहेत मुरगुड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा साठा प्रदूषित करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई व आर्थिक दंडाची अंमल बजावणी करावी पालिकेने तलाव परिसरात वॉचमन ठेवून पहारा ठेवावा अशा मागण्या केल्या आहेत. निवेदनावर  दिव्यांग नागरिकांच्या सह्या आहेत.

फोटो ..मुरगूड .येथे नगरपरिषदेकडील मूख्याधिकारी यांना आपल्या मागण्याचे निवेदन देताना अपंग बांधव  ..
               छाया राजू चव्हाण मुरगुड

No comments :

Post a Comment