Tuesday, 22 August 2017
राजर्षी शाहू विद्यामंदिरचा १४६ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न
कसबा बावडा दि.२१:
कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिसरातील इ.स.१८७१ ची स्थापना असणाऱ्या मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिरमध्ये शाळेचा १४६ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात पार पडला.आजच्या कार्यक्रमात प्राथमिक शिक्षण समिती सभापती मा सौ वनिता देठे यांनी " इतिहासाचा वारसा असणाऱ्या या महान शाळेचे नाव विद्यार्थ्यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर आणखी मोठे करावे व यशस्वी व्हावे " असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. सदर कार्यक्रमाला भागाच्या लोकप्रिय नगरसेविका माधुरीताई लाड , नगरसेवक अशोक जाधव,मुख्याध्यापक अजितकुमार पाटील ,फारूक नूर महंमद पाखाली, नितेश केसरकर,राकेश शिंदे,रोहिणी आचरेकर, भारतवीर मित्रमंडळाचे अध्यक्ष चेतन चौगले ,राहुल भोसले,व सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री.अभिजित जाधव शाळेचे माजी विद्यार्थी पालक व भागातील नागरिक आदी उपस्थित होते.
नगरसेविकामधुरीताई लाड मॅडम यांनी मुलांना शुभसंदेश देताना विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवून देशाची सेवा करावी असा संदेश दिला.
सदर शुभ प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्राजक्ता शिंदे मॅडम,उपाध्यक्षा पल्लवी पाटील,सदस्य रमेश सुतार साहेब,रजनी सुतार मॅडम,वैशाली कोरवी मॅडम,जेष्ठ शिक्षक उत्तम कुंभार, जयश्री सपाटे , सुजाता आवटी , प्राजक्ता कुलकर्णी,अरुण सुनगार,शिवशंभू गाटे,आसमा तांबोळी , बालवाडी शिक्षिका कल्पना पाटील मॅडम,गायत्री प्रभावळे मॅडम, सेवक हेमंतकुमार पाटोळे ,मंगल मोरे तसेच भागातील पालक,जेष्ठ नागरिक ,सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगीडॉ डी वाय पाटील डिझिटल बालवाडीचे उदघाटन व मुख्याध्यापक मा.अजितकुमार पाटील सर लिखित "आदर्श शालेय परिपाठ" या उपयुक्त पुस्तकाचे प्रकाशन तसेच हेमांतकुमार पाटोळे यांच्याकडून पहिलीच्या विद्यार्थ्यांना पाणी बाॅटल वाटप आदी कार्यक्रम सभापती वनिता देठे मॅडम यांच्या हस्ते पार पाडण्यात आले.शाळेच्या वतीने विशेष गुणवंत मुलांचा व देणगीदारांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करणेत आला. वर्धापनदिनानिमित्त श्रावणी साठे,अनुराधा कांबळे,व इतर मुलांनी भाषणे केली.कार्यक्रमाचे सुत्र संचलन श्रद्धा दाभाडे व भक्ती चव्हाण या विद्यार्थिनींनी केले तर सादिया शेख हिने आभार मानले.आजच्या मंगलप्रसंगी मुलांना गोड खाऊचे वाटप करणेत आले.
No comments :
Post a Comment