Saturday, 26 August 2017
हातकणंगले तालुका शारीरीक शिक्षक संघटना आणि इचलकरंजी कला अध्यापक संघाच्या वतीने लोकप्रतिनिधींचा सत्कार
इचलकरंजी (प्रतिनिधी) कला, क्रिडा शिक्षकांना आठवड्यातून ४ तास देणे आणि कला, शारीरीक शिक्षक पद कायम करण्याचा निर्णय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत झाला आहे. या निर्णयाचे स्वागत करत हातकणंगले तालुका शारीरीक शिक्षक संघटना आणि इचलकरंजी कला अध्यापक संघाने शासन प्रतिनिधी म्हणून आमदार सुरेश हाळवणकर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचा सत्कार केला. यावेळी आमदार हाळवणकर यांनी सरकार नेहमीच शिक्षकांसोबत राहिल, अशी ग्वाही दिली.
कला, क्रिडा शिक्षकांच्या तासिका कमी केल्यानं राज्यातील सर्वच शिक्षकांनी या विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली होती. प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन पूर्वीप्रमाणचं तासिका ठेवण्याची मागणी करत आंदोलनाची तिव्रता वाढवण्याचा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कला, क्रिडा शिक्षकांच्या मागण्यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षक समन्वय समितीच्या पदाधिकार्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी सहावी ते दहावी पर्यंतच्या वर्गाला कला, क्रिडा शिक्षकांना आठवड्यातील ४ तास देणे आणि कला, शारीरीक शिक्षक पद कायम ठेवण्याचा निर्णय झाला. बैठकीस विद्या प्राधिकरण पुणेचे संचालक मगर, उपसचिव सुवर्णा खोत, महाराष्ट्र राज्य क्रिडा, शारीरीक शिक्षक महासंघाचे शरदचंद्र धारुडकर, कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी आर.डी. पाटील, पुण्याचे विश्वनाथ पाटोळे, मुंबईचे चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते. या निर्णयाचे स्वागत करत आज हातकणंगले तालुका शारीरीक शिक्षक संघटना आणि इचलकरंजी कला अध्यापक संघाने आमदार सुरेश हाळवणकर आणि आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांची भेट घेऊन सत्कार केला. यावेळी शेखर शहा, सुरेंद्र दास, भिकाजी माने, शंकर पोवार, विजय, गुरव, राजेंद्र कडाळे, रावसाहेब कारंडे, ए.के. शिंदे, संजय साळुंखे, रवि कडाळे, आनंदा सुतार, रमेश चौगुले, राहुल कुलकर्णी, शाम कांबळे, बाजीराव बाणदार, सुभाष माने, रफिक मांगुरे, मलिक मणेरे, संभाजी बंडगर, कुबेर पाटील, गजानन लवटे ( शिक्षक सेना शहर अध्यक्ष ) पोपटराव वाकसे, दिलीप सुर्यवंशी, विकास मुदकुडे, जी.जी. कुलकर्णी, एस. हिरेमट, शिंदे सर वाठारकर यांच्यासह कला, क्रिडा शिक्षक उपस्थित होते.
No comments :
Post a Comment