Wednesday, 23 August 2017
शिक्षकांंच्या समस्या जाणून घेऊन सर्व प्रलंबित प्रस्तावाची कामे तात्काळ सुरू - शिक्षणाधिकारी बी.बी.भंडारे
हेरले/ प्रतिनिधी दि. २३/८/१७
माध्यमिक शिक्षण विभागातील सर्व प्रलंबित विविध मान्यतेच्या प्रस्तावाची कामे तात्काळ केली जात आहेत. प्रत्यक्ष शिक्षकांशी भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन कार्य केले जात आहे. त्यामुळे शिक्षक वर्गात समाधान व्यक्त होत आहे. असे मत माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बी.बी. भंडारे यांनी व्यक्त केले. ते स्वाभिमानी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक सेवाभावी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी मान्यतेच्या चर्चाबैठक प्रसंगी बोलत होते.
जिल्हा परिषद कोल्हापूरचा माध्यमिक शिक्षण विभाग काही महिने विविध समस्येवर गाजत होता. त्यामुळे लिपिक,अधिकारी यांच्यात मोठया प्रमाणात बदल्या झालेने शिक्षण विभागात नूतन वरिष्ठ लिपीक बदली होऊन आले आहेत. शिक्षणाधिकारी बी.बी. भंडारे, उपशिक्षणाधिकारी एल.एस. पाश्चापूरे , अधिक्षक पी.एन. नलवडे आदी अधिकारी वर्गांनी नियोजनबध्द प्रशासन कार्यप्रणाली सुरू केल्याने विविध प्रलंबित मान्यतेची कामे पुर्णत्वास येत आहेत.
स्वाभिमानी शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी संघाच्या वतीने दोन पदोन्नती व सात बदली मान्यतेचे प्रस्ताव सादर केले होते.तात्काळ वरिष्ठ सहायक आर.एन. घोटणे यांनी आदेश तयार करून मान्यता मिळवून दिल्या. वरिष्ठ सहाय्यक शिवाजी खंटागळेकर, अभिजीत बंडगर, वाय.बी. चव्हाण , पूनम ठमके, ए.एस. कणसे, कनिष्ठ सहाय्यक ए. ए. दिंडे, डी.टी. पाटील आदी कर्मचारी वर्ग माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठश्रेणी,निवडश्रेणी, बदली मान्यता, दवाखाना बील मंजूरी, पदोन्नती मान्यताची कामांचा निपटारा जलद गतीने करीत आहेत. तात्काळ कामे होत असल्याने शिक्षक वर्गात समाधान व्यक्त आहे. या बैठकीस शिक्षक नेते प्रा. भास्कर चंदनशिवे, राजेंद्र माने, पोपटराव वाकसे, जिल्हाध्यक्ष मिलींद बारवडे,लक्ष्मण कांबरे, सरचिटणीस भाऊसाहेब सकट, जिल्हाकार्याध्यक्ष अभिजीत गायकवाड, संघटक फुलसिंग जाधव, खजानिस नंदकुमार कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो - स्वाभिमानी शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांना मान्यता आदेश प्रदान करतांना शिक्षणाधिकारी बी.बी. भंडारे शेजारी अधिक्षक पी.एन. नलवडे, वरिष्ठ सहाय्यक आर.एन. घोटणे.
( छाया मानसिंग निंबाळकर)
No comments :
Post a Comment