Wednesday, 23 August 2017
मौजे वडगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर
हेर्ले/ वार्ताहर दि. २३/८/१७ हातकणंगले तालूक्यातील मौजे वडगाव येथील संजिवनी मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट व ट्युलिप हा़ँस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रूग्ण तपासणी शिबिर संपन्न झाले. उद्घाटन जेष्ठ नागरिक (वय९७)देवाप्पा नाना सुतार यांच्या हस्ते झाले.
सदर शिबिरात डॉ.दीपक देशपांडे (अस्थिरोग तज्ञ), डॉ.संदिप पाटील (हृदयरोग तज्ञ), डॉ.कविता शहा(मानसोपचार तज्ञ), डॉ.रोहिणी देशपांडे (दंतरोग तज्ञ), डॉ.शिल्पा पाटील (बालरोग तज्ञ) यांचा सहभाग होता.
प्रमुख उपस्थिती: सरपंच-सतिश चौगुले प्रकाश कांबरे मधुकर आकिवाटे , डॉ.दिग्विजय भातमोर, डॉ. प्राजक्ता खोत, डॉ.शब्बीर हजारी, संकेत सोनवणे,नाशिर हजारी, इकबाल सवार व ग्रामस्थ इ.एकुण २२९ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
फोटो - मौजे वडगांव येथील आरोग्य शिबीराच्या युनिटचा सत्कार करतांना आनंदा पोवार.
No comments :
Post a Comment