Tuesday, 29 August 2017
श्री शाहू हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय कराटेपट्टू जयदेव म्हमाणे यांचा सत्कार
हेरले/ प्रतिनिधी दि. २९/८/१७
आतंरराष्ट्रीय कराटे पट्टू माजी विद्यार्थी जयदेव घन:शाम म्हमाणे यांची ऑलम्पिक कॉन्सिल ऑफ एशियाच्या वतीने तुर्कमेनिस्तान येथे होणाऱ्या एशियन इनडोअर व मार्शल आर्ट गेम्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाले बद्दल श्री शाहू हायस्कूल ज्यु.कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सत्कार मुर्ती जयदेव म्हमाणे म्हमाणे म्हणाले की, खेळाबद्दल आस्था असावी लागते. ज्युदो कराटे या खेळांना ऑलिम्पिक प्रवेश नसतांना त्याच्या बरोबरीचे खेळ आत्मसात केले.परिस्थिती गरीब असतांनाही पै- पै जमा करून आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी झालो. जिद्द चिकाटी यशस्वी होण्यास प्रेरणा देत असते. पुढील महिन्यातील सर्धेत गोल्ड पदकाची कमाई केल्यास ऑलम्पिक सर्धेत भारतासाठी खेळण्यास संधी मिळेल त्यासाठी प्रयत्नशील आहे.
अध्यक्षस्थानावरून मुख्याध्यापक महावीर रुग्गे म्हणाले की, आपल्या संस्थेंचे ब्रीदवाक्य बहुजन हिताय बहुजन सुखाय असल्याने आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्याचे कार्य शाळेने केले आहे. जयदेव म्हमाणे यांनी बोर्डींगमध्ये राहून आपल्या शाळेत ज्ञानाचे धडे घेतले. याचा सार्थ अभिमान आम्हास आहे. त्यांनी आणखीन मोठे यश मिळवावे.
त्यांची यशस्वी भरारी घेत २०१० साली साऊथ आफ्रिका( ब्रॉन्झ मेडल) २०११ इराण ( गोल्ड मेडल)२०१२ किरझिस्तान ( सिल्वर मेडल)२०१३ रशिया( ब्रॉन्झ मेडल २०१४ रशिया (सिल्वर व ब्रॉन्झ मेडल) २०१५ इंडिया (सिल्वर मेडल) २o१७ तुर्के मेनिस्तान( ब्रॉन्झ मेडल) अशी विविध देशांतून सातपदकांची कमाई केली आहे.
या प्रसंगी उपमुख्याध्यापक रविंद्र देशमाने, पर्यवेक्षिका एस.ए. कुलकर्णी, माजी मुख्याध्यापक सी.एस. कुलकर्णी, डी.डी. प्रभावळकर, जे.एस. भोसले, जे.जी. गांगरकर, एस.जी. देवर्षी, अजित माने, उपप्राचार्य पी.एन. शिंदे,एस.यु. देशमुख, एस.आर. पोतदार.एस.एम. नाईक. सूत्रसंचालन कादर जमादार यांनी केले.शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो - श्री शाहू हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय कराटेपट्टू जयदेव म्हमाणे यांचा सत्कार करतांना मुख्याध्यापक महावीर रूग्गे, उपमुख्याध्यापक रविंद्र देशमाने
( छाया- सुधाकर निर्मळे)
No comments :
Post a Comment