Wednesday, 30 August 2017
हातकणंगले येथे संजय गांधी निराधार योजनेच्या १२४ लाभार्थ्यांना मंजूर आदेशाचे वाटप
हेरले/ प्रतिनिधी दि. २९/८/१७
संजय गांधी निराधार योजनेच्या १२४ लाभार्थ्यांना मंजूर आदेशाचे वाटपाचा कार्यक्रम तहसील कार्यालय हातकणंगले येथे आमदार डॉ . सुजित मिणचेकर यांचे अध्यक्षतेखाली व प्रांताधिकारी समिर शिंगटे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
प्रास्तविक नायब तहसीलदार पाटील मॅडम यांनी केले वं आज अखेर पात्र लाभार्थीची मंजूर प्रकरणाचा तपशील दिला. २९ जुलै २०१७ रोजी झालेल्या मिटींगमध्ये श्रावणबाळ ४० प्रस्ताव, संजय गांधी ७० प्रस्ताव,इंदिरा गांधी वृध्दपकाळ ०६ प्रस्ताव, इंदिरा गांधी विधवा पेन्शन ०८ प्रस्ताव, असे एकूण १२४ प्रस्ताव मंजूर करणेत आले असलेचे संजय गांधी योजनेचे अध्यक्ष महेश चव्हाण यांनी स्वागतामध्ये सांगीतले. तहसीलदार वैशाली राजमाने मॅडम यांनी गरजूनी योजनेचा लाभ घेण्याचे आवहान केले व कोणावर अन्याय होणार नाही यांची दक्षता घेण्याचे आश्वासन दिले.
आमदार डॉ. मिणचेकर यांनी संजय गांधी योजनेचे अध्यक्ष, सर्व अधिकारी, तहसीलदार, मॅडम हे सर्वजण चांगल्या पद्धतीने काम करून गरजूंना चांगल्या पद्धतीने योजनेचा फायदा करून देत असलेचे सांगीतले, उत्पन्न दाखला मर्यादा ५० हजार करण्यासाठी प्रयत्न करणार असलेचे सांगितले. लाभार्थनी शेजारी सांगुन योजनेचा फायदा घेण्याचे आवहान केले.करपात्र १२४ लाभार्थी पैकी हजर असणाऱ्या ३५ते ४० लाभार्थीना मंजूर आदेशाचे वाटप आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते, प्रांताधिकारी मा. श्री. समीर शिगंटे, संजय गांधी निराधार योजना हात . तालुका अध्यक्ष महेश च०हाण, तहसीलदार वैशाली राजमाने मॅडम, नायब तहसीलदार, अर्चना पाटील मॅडम,सामाजीक कार्यकर्ते प्रकाश कांबरे, सं . गांधी कमिटी सदस्य , महावीर कांबळे, रुकडी पंचायत समिती सदस्य, लक्ष्मण मुरूमकर, कुंभोज ग्रां. पं . सदस्य ,संजय गांधी योजना कार्यालय अधिकारी, एन.एस. ढोबळे, अव्वल कारकून, भरत काळे, नेहा डोनकर मॅडम, उपस्थित होते.
No comments :
Post a Comment