Wednesday, 30 August 2017
कृष्णराज महाडिक यांचे आज कोल्हापूर मध्ये भव्य सहर्ष स्वागत
प्रतिनिधी सतिश लोहार .............
इंग्लड मधील आंतरराष्ट्रीय फॉर्म्युला 3 रेसिंग स्पर्धेत मध्ये प्रथम स्थान पटकावुन, कोल्हापूरसह भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकवलेल्या कृष्णराज धनंजय महाडिक यांचे आज कोल्हापूर मध्ये भव्य सहर्ष स्वागत करण्यात आले.कृष्णराजच्या यशामुळं कोल्हापूरचा लौकीक आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढला आहे. देशाच्या सर्वोच्च "लोकसभा" सभागृहात म्हणजे संसदेतही कृष्णराज धनंजय महाडिक यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
आज कोल्हापूरमध्ये ताराराणी पुतळा येथे आयोजित केलेल्या स्वागत समारंभात कोल्हापूर करांनी उस्फूर्तपणे स्वागत केले यावेळी छत्रपती शाहू महाराज, महादेवराव महाडिक, नामदार चंद्रकांत दादा पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment