Powered by Blogger.

Saturday, 26 August 2017

करवीर तालुका शालेय बुद्धीबळ स्पर्धा श्री हरेश्र्वर माध्यमिक आरे चे घवघवीत यश.............

No comments :

प्रतिनिधी सतिश लोहार,  

  काडसिद्धेश्वर हायस्कुल कणेरी या ठिकाणी गुरुवार दि.२४/८/२०१७ रोजी करवीर तालुकास्तरीय  बुद्धीबळ स्पर्धा पार पडल्या.स्पर्धेचे उद्घाटन कृष्णात पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले.  स्पर्धा शिंत्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरीत्या पार पडली.   या स्पर्धेत श्री हरेश्वर माध्य. विद्यालय आरे ने घवघवीत यश मिळविले.१४ वर्षे वयोगट मुलांमध्ये पाचवा क्र. रितेश मुळीक, मुलींमध्ये तिसरा क्रमांक साक्षी खाडे, चौथा क्रमांक    तेजस्वीनी कुडीत्रेकर,पाचवा क्रमांक रसिका वरूटे पटकावला.   
                    १७ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये दुसरा क्रमांक महेश मोहिते, तिसरा क्रमांक धैर्यशील चौगले,. मुलींमध्ये पाचवा क्रमांक सानिका मुळीक ने पटकावला. तसेच चारही गटात क्रमांक पटकावणारी  पहिली शाळा होण्याचा मान मिळवला.सर्व विद्यार्थ्यांना श्री घोलप एस.एन. सर यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments :

Post a Comment