Saturday, 9 September 2017
गौरीलंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने निषेध सभा
हेरले/ प्रतिनिधी दि. ९/९/१७
कर्नाटकातील जेष्ठ पत्रकार व साप्ताहिक लंकेश पत्रिकेच्या संपादिका गौरीलंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली.
कर्नाटक राज्यातील लंकेशपत्रिका या साप्ताहिकाच्या संपादिका गौरीलंकेश यांची हत्या झाली आहे. गौरी लंकेश या निर्भीड आणि परखड लिखाणासाठी प्रसिद्ध होत्या. मात्र व्यक्ती मारल्याने विचार मरत नसतात. त्यामुळे विचार व्यक्ती स्वातंत्र्यावर हा हल्ला झाला आहे.जेष्ठ विचारवंत दाभोळकर, कॉ.पानसरे,कुलबर्गी या विचारवंतांची हत्या करणारे आरोप्यांना पकडण्यात शासनाला यश आले नाही. हे आरोपी मोकाट असताना गौरी लंकेश यांची हत्या धक्कादायक आहे.तपास यंत्रणेने हत्या-यांचा सखोल तपास करून आरोपींना बेड्या ठोकाव्यात अशी मागणी सर्वानुमते करण्यात आली.
या सभेस पत्रकार सुधाकर निर्मळे, अभिजित कुलकर्णी, सुरेश पाटील, पोपटराव वाकसे, नंदकुमार कुलकर्णी, अतुल मंडपे,सुरेश कांबरे, ताज मुलाणी, दिपक मांगले, दयानंद लिपारे, विठ्ठल बिरंजे, विवेक दिंडे, संजय दबडे, संतोष सणगर, दिपक जाधव, दिपक यादव, चंद्रकांत मिठारे, दगडू माने, डॉ. टी. एस. पाटील, डॉ. निवास वरपे, दिलीप पाटील, भाऊसाहेब सकट, भास्कर चंदनशिवे, राजेंद्र होळकर, अतुल आंबी, बाबासाहेब राजमाने,नंदकुमार कांबळे, अवधूत आठवले, प्रकाश तिराळे, शशिकांत भोसले, विष्णुपंत इंगवले, संतोष तिराळे, संतोष बामणे, सुधाकर पाटील, मोहन सातपूते, लक्ष्मण कांबरे, अजिंक्य यादव, हरी बूवा, प्रा. रविंद्र पाटील, शशिकांत राज, सचिनकुमार शिंदे, अनिल तोडकर, धनाजी गुरव, भिकाजी पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
No comments :
Post a Comment