Powered by Blogger.

Saturday, 9 September 2017

ज्ञानमंदिराचा शिक्षक हा पूजारी असतो-रमजान कराडे

No comments :

ज्ञानमंदिराचा शिक्षक हा पूजारी असतो-रमजान कराडे

कागल /प्रतिनिधा ता.8
     आई आपल्या मूलाला पाजवित असलेलं दूध व शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना देत असलेलं ज्ञान यामध्ये जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्यामध्ये भेसळ अथवा चूकीच आढळत नाही.म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी दाखविलेल्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करावा. शिक्षक आपल्या सेवेमध्ये ज्ञानाची भव्य मंदिरे उभा करतो.व आपण त्या मंदिराचा शेवटपर्यंत पूजारीच राहतो.व असाच शिक्षक आदर्श शिक्षक असल्याचे प्रतिपादन रमजान कराडे यांनी केले.
       श्री शाहू हायस्कूल अॅण्ड  ज्युनियर कॉलेज कागल येथे शिक्षक दिनानिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या  कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक आर.जी. देशमाने होते.यावेळी सौ.एस. ए.कुलकर्णी,संजय पोतदार, काकासो भोकरे, एस.वाय. बेलेकर उपस्थित होते.
    ते पुढे म्हणाले,समाजातील ओबडधोबड दगडातून आपल्या ज्ञानरूपी हातोड्याने शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनाची मशागत करतो.अशावेळी तो तो कधी सानेगुरूजींच्या रूपात मातृह्दय होवून तर कधी पाठीवरती शाबासकीची थाप ठेवून लढ म्हणतो.असा हा शिक्षक अज्ञानाच्या अंधकारातून प्रकाशाकडे, गरजेकडून अपेक्षापूर्तीकडे नेतो.व विद्यार्थ्यांना यशाचे शिखर गाठण्यास मदत करतो.
     आर.जी.देशमाने म्हणाले, आई वडीलानंतर शिक्षकच अशी व्यक्ती असते जी मुलांचे भवितव्य घडवित असते. शिक्षक हा मुलांच्या आयुष्याला कलाटणी देतात. त्यांचे भवितव्य घडवितात.  अशा या शिक्षकांचा आपण नेहमी आदर ठेवला पाहिजे.
     बाबासो हळीज्वाळे यांनी स्वागत प्रास्तावीक केले. यावेळी साक्षी पाटील,श्रृती वारके,प्राची पाटील,स्नेहा मोरे यांची देखील भाषने झाली. यावेळी शिक्षक,विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. एस.के.भोसले यांनी सुत्रसंचालन केले.तर फुलचंद जाधव यांनी आभार मानले.

फोटो-कादर जमादार
फोटो -श्री शाहू हायस्कुल कागल येथे शिक्षक दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात बोलताना रमजान कराडे समोर उपस्थित विद्यार्थी

No comments :

Post a Comment