Powered by Blogger.

Wednesday, 13 September 2017

म्हैस दुध वाढीसाठी संघाचे दूध उत्पादकांसाठी अत्यंत  चांगले धोरण - गोकुळ अध्यक्ष विश्वासराव पाटील

No comments :

हेरले/ प्रतिनिधी दि. १३/९/१७                                                              गाय दुधाचे वाढते व म्हैस दुधाचे घटते प्रमाण हि गोकुळ दुध संघासाठी चिंतेची बाब आहे. भविष्यात म्हैस दुध वाढीसाठी संघाचे दूध उत्पादकांसाठी अत्यंत  चांगले धोरण ठरवले जाईल . असे मत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ ) संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील यांनी व्यक्त केले.
गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा पंधरा सप्टेंबर रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर  हातकणंगले तालुक्यातील प्राथमिक दुध संस्थांची संपर्क सभा ताराबाई पार्क येथे आयोजीत करण्यात आली होती . यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते,
गोकुळ दूध संघास सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाकडून सहकार भुषन व सलग चौथ्यांदा उर्जा बचत पुरस्कार मिळाल्याबद्दल विश्वासराव पाटील यांचा नामदेवराव भगत दूध संस्था तारदाळचे चेअरमन जयप्रकाश भगत यांच्या हस्ते. तसेच जेष्ठ संचालक अरूण नरके यांची इंडियन ङेअरी डेव्हलपमेंट बोर्ड  भारत सरकार या संस्थेच्या चेअरमनपदी निवड झाले बद्दल दत्त दूध संस्था रेंदाळचे चेअरमन भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते जाहिर सत्कार करण्यात आला.
        ते पुढे म्हणाले , गोकुळ संघाचा पाया म्हैस दुधावरच रचला आहे. दररोज सात लाख लिटर दुधास मागणी आहे . पण उत्पादन चार ते पाच लाख लिटर इतके आहे. कमी पडणारे दुध अन्य संघाचे खरेदी करावे लागत आहे. हे संघाच्या दृष्टीने चांगले नाही. म्हणून म्हैशींचे दुध  वाढविण्यासाठी सर्व संस्था प्रतिनिधी व उत्पादक यांनी प्रयत्न व सहकार्य करावे असे आवाहन करून ,  संघाचेही धोरण लवकरच जाहिर केले जाईल असे सांगितले .
यावेळी तालुक्यात उत्तमप्रत , जास्तीत जास्त दुध पुरवठा व महिला आदी बक्षिस पाञ ठरलेल्या संस्था अनुक्रमे दत्त तळंदगे , कृष्ण रांगोळी व इंचलकरंजी , नामदेवराव भगत तारदाळ , बजरंग संभापूर , गणेश अंबप, किसान रूई, कामधेनू मौजे वडगाव , यांचा विषेश सत्कार करण्यात आला.
       स्वागत प्रास्ताविक विश्वास जाधव यांनी केले तर आभार रणजित पाटील यांनी मानले.
या सभेस संचालक अरूणकुमार डोंगळे , पी.डी.धुंदरे. रविंद्र आपटे, बाळासाहेब खाडे, उदय पाटील , दिपक पाटील , राजेश पाटील , जयश्री पाटील , सत्यजित पाटील , कार्यकारी संचालक डी.व्ही . घाणेकर , संकलन व्यवस्थापक शरद तुरंबेकर, एम.एस.चौगुले , डाँ ,मोगले, शहा, स्वाॕमी , मोळे, समुद्रे , कापडीया, आदी विभाग प्रमुख व संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.
संपर्क सभेचे नियोजन वरिष्ठ दुध संकलन अधिकारी दत्ता वागरे, सहाय्यक अधिकारी विश्वासराव इंगवले , भास्कर पाटील , सुरेश पाटील , सुधिर पाटील , विक्रम पाटील व विक्रम बागल यांनी केले.
      फोटो ......
--- गोकुळ दुध संघाच्या हातकणंगले तालुका संपर्क सभेत बोलताना चेअरमन विश्वासराव पाटील . प्रसंगी अरूण नरके , विश्वास जाधव , जयश्री पाटील , बाळासाहेब खाडे, डी.व्ही.घाणेकर आदी.

No comments :

Post a Comment