Powered by Blogger.

Wednesday, 13 September 2017

रोटरी क्लब आॕफ गार्गिज कोल्हापूरच्या वतीने 'यामिनी' प्रदर्शन

No comments :

हेरले/ प्रतिनिधी दि. १३/९/१७

रोटरी क्लब आॕफ गार्गिज कोल्हापूरच्या वतीने १६ सप्टेंबर रोजी 'यामिनी 'प्रदर्शनास सुरूवात होणार आहे. कोल्हापूरातील धैर्यप्रसाद हाँल ताराबाई पार्क येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात अनेक शहरातील नामांकित विविध प्रकारचे विक्रेते सहभाग घेणार आहेत .अशी माहिती गार्गिज क्लबच्या अध्यक्षा रो.डाॕ विशाखा आपटे व सेक्रेटरी रो.गौरी शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितली .
१६ व १७ सप्टेंबर या दोन दिवस चालणार्या  प्रदर्शनाचे उद्घाटन रोटरीचे प्रांतपाल आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते व माजी गृह राज्यमंञी सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या प्रदर्शनात कोल्हापूर, इचलकरंजी सह मुंबई , अहमदाबाद , बंगलूर , पुणे, मालेगाव अशा अनेक शहरातील नामांकित विक्रेते सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनात वेगवेगळ्या प्रांतात प्रसिद्ध असलेल्या आधुनिक नऊवारी  साड्या , ड्रेस मटेरियल, ब्लाउज , लहान मुलांची कपडे , गृहशोभेच्या वस्तू , पर्स, खाद्य पदार्थ आदींचे स्टाॕल मांडण्यात येणार आहेत . याचा जिल्ह्यातील महिला व पुरूषांनी लाभ घ्यावा . असे आवाहन आपटे व शिरगावकर यांनी केले आहे.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून जमा होणार निधी जि.प.च्या शाळांना संगणक संच, वाॕटर प्युरिफायर, खेड्यात सोलर लाईट , गरीब मुलींना सायकल वाटप, आदि सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करण्यात येणार आहे. असे विशाखा आपटे व गौरी शिरगावकर यांनी सांगितले .
पत्रकार  परिषदेस रो.सविता पदे, मेघना शेळके , रेणूका सप्रे , बिना जानवाडकर, गिरीजा कुलकर्णी , साधना घाटगे , दिपीका कुंभोजकर, सुजाता लोहिया, आदीसह कल्बच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
----------------------------------------------------------


No comments :

Post a Comment