Thursday, 14 September 2017
संदीप कुंभार यांची भाजपच्या ओ.बी.सी.पन्हाळा तालुका अध्यक्षपदी निवड
पैजारवाडी प्रतिनिधी :-
बोरपाडळे (ता. पन्हाळा) येथील संदीप सर्जेराव कुंभार यांची भाजपच्या ओ.बी.सी.पन्हाळा तालुका अध्यक्षपदी निवड झालेबद्दल कुंभार समाजच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास पन्हाळा-बावडा कुंभार समाजाचे अध्यक्ष रामचंद्र कुंभार,उपाध्यक्ष विक्रम कुंभार यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रथम संत गोरोबा काका यांचा प्रतिमेचे पूजन करून प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दिपप्रजवलन करण्यात आले.यावेळी कुंभार समाजातील जेष्ठनागरिकांचा हि सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच शरद जाधव,सचिव राजाराम कुंभार,आदिनाथ कुंभार,तसेच ग्रा.प.सदस्य ग्रामस्थ दै.पुढारीचे पत्रकार कृष्णात हिरवे पुण्यनगरी पत्रकार श्रीकांत कुंभार व समस्त कुंभार समाज उपस्थित होता कार्यक्रमाचे प्रस्ताविक भगवान कुंभार यांनी केले सूत्रसंचालन विष्णू कुंभार तर आभार सर्जेराव दगडू कुंभार यांनी मानले.
No comments :
Post a Comment