Friday, 15 September 2017
बिद्रीच्या सभासदांना दिवाळीची सभासद साखर देऊन गोडवा देण्यासाठी के पी पाटील यांच्या पॅनलला विजयी करा - हसन मुश्रीफ
मुरगुड प्रतिनिधी
समीर कटके
विरोधकांच्या गोरगरिबांना नाडण्याच्या प्रवृत्तीमुळे अपात्र ठरलेल्या बिद्रीच्या सभासदांना दिवाळीची सभासद साखर देऊन गोडवा देण्यासाठी के पी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनल पंधरा ते वीस हजाराच्या मताधिक्याने विजयी करायचे असा निकाल सभासदांनी घेतला आहे असा विश्वास माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आम हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
कुरुकली ता कागल येथील घोडेश्वर मंदिरात बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. सयाजीराव पाटील अध्यक्षस्थानी होते.
बिद्रीचे माजी अध्यक्ष के पी पाटील म्हणाले आमचे मित्र राधानगरी भूदरगडचे आमदार प्रकाशराव अबिटकर यांनी आंबोलीच्या टोकापासून ते धामोड खोऱ्यापर्यंत पसरलेल्या तालुक्यासाठी काय केले हे जनतेला माहिती आहे.पण एक काम मात्र निष्ठेने केले ते म्हणजे शेतकऱ्यांचे सभासदत्व रद्द केले. मग फटाके वाजवले, पेढे वाटले. एका लोक प्रतिनिधीचे वागणं वेदना देणारे आहे.हीच मंडळी सहवीज प्रकल्प उभा राहिला तर कारखान्याचे वाटोळं होईल असे सांगत होती. प्रकल्प अंतिम टप्प्यात आल्यावर याच लोकांनी वीज वाहिन्या टाकताना अडचणी निर्माण केल्या आणि प्रकल्प पूर्ण झाल्यावर के पी नी प्रकल्प पूर्ण करून असा काय मोठा पराक्रम केला काय ? असं म्हणत विषारी प्रचार करत आहेत.सभासदांनी
या प्रवृत्तीना कड्यासारखे वेचून फेकावे. गेल्या हंगामात ऊस तोडणीच्या कार्यक्रमात उणिवा राहिल्या त्या जाणून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ऊस तोडणी कार्यक्रम राबवण्यासाठी टाटा कॅन्सल्टंसीशी करार अंतिम टप्यात आला होता पण तोपर्यंत प्रशासक आल्याने हे काम राहून गेले पण आगामी काळात हे कार्य पूर्ण करणार तसेच ठिबक सिंचनासाठी 50 टक्के अनुदान देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
प्रशासकांच्या काळात जाहीर अहवालातच आमच्या काळात कारखाना उत्तम चालल्याचा उल्लेख आहे त्यामुळे आम्हाला इतर कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही.
आमदार हसन मुश्रीफ ,माजी आमदार के.पी.पाटील,जिल्हा राष्ट्रवादी चे अध्यक्ष ए.वाय.पाटील, जिल्हा संघाचे अध्यक्ष यूवराज पाटील,बिद्रीचे माजी उपाध्यक्ष प्रविणसिंह पाटील,संचालक गणपतराव फराकटे,जि.प.सदस्य जीवन पाटील, जिल्हाबँकेचे संचालक भैया माने,प्रविणसिंह भोसले, रंगराव पाटील( सूरुपली),दत्ताञय पाटील( आदमापूर)मधूकर भोई( वाघापूर),नंदकूमार पाटील(बिद्री ), शशिकांत खोत,राजेंद्र पाटील( सरवडे),विकास पाटील( कूरुकली )सयाजीराव पाटील,डी.आर.पाटील(कूरुकली )विविध संस्थाचे प्रतिनिधी ,सभासद शेतकरी बांधव मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.
No comments :
Post a Comment