Saturday, 9 September 2017
आदर्श विद्यालय आंबवडेचे व्हॉलीबॉल मध्ये यश
पैजारवाडी प्रतिनिधी :-
वारणा विद्यालय वारणा येथे संपन्न झालेल्या तालुका स्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत आदर्श विद्यालय आंबवडे (ता. पन्हाळा) या विद्यालयाच्या १४ वर्ष वयो गटातील संघाने द्वितीय क्रमांक मिळवून सुयश संपादन केले.याबद्दल आंबवडे व परिसरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या संघामधील अभिषेक कांबळे याच्या उत्तम खेळीमूळे
संघास यश मिळाल्याने त्याचे विशेष कौतुक होत आहे.
या संघाला विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष राजाराम शिपुगडे, उपाध्यक्ष शंकर जगदाळे,सचिव सर्जेराव खुडे, मुख्याध्यापक संभाजी जाधव,क्रीडाशिक्षक संजय मगदूम, विद्यालयाचे सर्व शिक्षक ,संचालक, कर्मचारी व पालक यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो :- आदर्श विद्यालय आंबवडे (ता.पन्हाळा) चे मुख्याध्यापक संभाजी जाधव, क्रीडाशिक्षक संजय मगदूम व हॉलीबॉल संघातील सर्व खेळाडू
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment