Powered by Blogger.

Saturday, 9 September 2017

संजय मंडलिक यांना खासदार करण्याची जबाबदारी आता जनतेची पालिकेच्या विविध विकास कामांचा शुभारंभ

No comments :

मुरगुड प्रतिनिधी
          खा सदाशिवराव मंडलिकांचे ते मंत्री असताना कोकणावर विशेष प्रेम होते. त्यांनी सामाजिक ऐक्य जपताना अल्पसंख्यांक कार्यकर्त्यास आपला वारस म्हणून विधानसभेत संधी दिली त्याच पद्धतीने मुरगुड नगराध्यक्ष पदाची संधी एका अल्पसंख्यांक कार्यकर्त्यास दिली असाच वारसा जपण्याचे कार्य कोल्हापूरच्या जनतेने प्रा संजय मंडलिक यांना खासदार करून पार पाडावे असे आवाहन गृह ( ग्रामीण ) वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक भाई केसरकर यांनी केले
        मुरगुड नगरपरिषदेच्य विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी गृहराज्यमंत्री नाम.केसरकर बोलत होते.प्रा.संजय मंडलिक अध्यक्षस्थानी होते.आमदार प्रकाश आबीटकर,माजी आमदार संजय घाटगे,माजी आमदार दिनकरराव जाधव,विरेंदसिह मंडलिक,विजय देवणे आदी प्रमुख उपस्थीत होते.
      मंत्री केसरकर म्हणाले
    जलतरण तलावसाठी राज्यशासनाच्या वैशिष्ठ पूर्ण विकास योजनेतून दोन कोटींचा निधी तसेच आंबाबाई मंदिराच्या कामासाठी पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून एक कोटींचा निधी लवकरच मिळवून देऊ अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली . मुरगुड पालिकाही जिल्ह्यातील सेनेच्या ताब्यातील एकमेव नगरपालिका असल्याने ती विशेष महत्वाची आहे त्यासाठी विकास निधीसाठी आपले व्यक्तिशः सहकार्य राहील. लोकांनी सत्ताबदल ज्या भावनेतून केला त्या भावनांशी एक होऊन कार्य करा डोक्यात सत्ता घुसू देऊ नका असा सल्ला त्यांनी दिला.

प्रा.संजय मंडलिक म्हणाले,बिद्रीच्या निवडणूकीसाठी अर्ज नेहण्यासाठी झुंबड उडाली आहे.लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत.त्यामुळे नेत्यांचा कास लागणार आहे.बिद्रीचे 15 हजार सभासद रद्द केल्याचा आरोप विरोधक करत आहेत.पण जे सभासद रद्द केलेत ते फक्त साखरेसाठी बाहेरून करण्यात आले होते.खऱ्या सभासदांना न्याय मिळावा यासाठी ती लढाई लढण्यात आली.हि लढाई महाभारतासारखी होते कि काय अस वाटतंय.एका बाजूला आम्ही सामान्य कार्यकर्त्याना घेऊन लढत आहोत.तर दुसऱ्या बाजूला प्रचंड पैशाचा दहशतवाद होणार आहे.बिद्री ही कागलची सहकारातील मातृसंस्था आहे.तेथे चांगलेच लोक गेले पाहिजेत.
आमदार प्रकाश आबीटकर म्हणाले,भुदरगड तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी आम्हाला पाठींबा दिला आहे.15 हजार सभासद रद्द झाल्याचा ठपका आमच्यावर ठेवला जातोय.पण त्यातून आमदार मुश्रीफांच्या मेहुण्या - पाहुण्यांचे सभासद रद्द करण्याचे काम झाले आहे.पै -पाहुण्यांच्या राजकारणाला बिद्रीचे सभासद सुरुंग लावल्या शिवाय राहणार नाहीत असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
प्रसंगी वीरेंद्र मंडलिक यांचे ही भाषण झाले.
यावेळी प्रा.संजय मंडलिक यांचा सदाशिवराव मंडलिक सह.साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झालेबद्दल नाम.केसरकर यांच्या हस्ते हृदय सत्कार करण्यात आला.तसेच पालिकेतर्फे वैयक्तिक स्वच्छतागृह अनुदान व अपंग लाभार्थींना निधीचे वाटप मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले.तर माजी आमदार संजय घाटगे यांच्या हस्ते बॅकेट वाटप करण्यात आले.
        वैयक्तिक स्वच्छतागृह अनुदान वाटप, अपंग लाभार्थींना निधी वाटप राज्य मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या हस्ते, बकेट वाटप मा आ संजयबाबा घाटगे, विंधन विहीरीना हातपंप बसविण्याचा कार्यक्रम आ . प्रकाशराव आबिटकर यांच्या हस्ते, गांडूळ खत प्रकल्प इमारत भूमीपूजन संचालक  वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते विविध कार्यक्रम करण्यTत आले . या संयुक्त कार्यक्रमाचे अध्यकस्थानी मंडलिक कारखाना चेअरमन प्रा . संजय मंडलिक होते .
            यावेळी मंडलिक कारखाना संचालक वीरेंद मंडलिक, मा .आम .दिनकरराव जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे,मंडलिक कारखाना उपाध्यक्ष बंडोपंत चौगले, बिद्रीचे माजी उपाध्यक्ष विजय सिंह मोरे, सभापती सौ .कमल पाटील, मंडलिक साखरचे माजी उपाध्यक्ष प्रकाश पाटील, बिद्रीचे माजी संचालक के .जी. नांदेकर, जि .प. सदस्य सौ .वंदना जाधव, सौ . शिवानी भोसले, आर .डी. पाटील , बी .एस. देसाई, नंदकुमार ढेंगे, अर्जुन आबिटकर, नंदकिशोर सुर्यवंशी, संभाजीराव भोकरे, मारूती चोथे, पं .स. सदस्य विजय भोसले, विश्वास कुराडे, सौ .पूनम मगदूम, सौ . मनिषा सावंत, मंडलिक कारखाना संचालक शिवाजीराव इंगळे , आनंदराव मोरे, दिनकर पाटील, शहाजी पाटील, शंकर पाटील, मारूती काळुगडे, धनाजी बाचणकर, द तात्रय चौगले, जयसिंग गिरीबुवा, आप्पासाहेब तांबेकर, मसू पाटील, कैलास जाधव, शहाजी यादव, चित्र गुप्त प्रभावळकर, सौ राजश्री चौगले, सौ .नंदिनीदेवी घोरपडे, सर्जेराव पाटील, दत्ताजीराव उगले, केशवकाका पाटील, सुखदेव येरूडकर, बाजीराव गोधडे, पांडूरंग भाट, सुहास खराडे, नगर परिषदेचे सर्व नगरसेवक यांच्यासह लाभार्थी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते .स्वागत उपनगराध्यक्ष जयसिंगराव भोसले , प्रास्ताविक नगराध्यक्ष राजे खान जमादार, सूत्रसंचालन प्रा . सुनिल डेळेकर यांनी तर आभार प्रा रवी शिंदे यांनी म्हणाले.

No comments :

Post a Comment