Friday, 8 September 2017
पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वतीने वार्षिक प्रशिक्षण शिबीर
हरले/ प्रतिनिधी दि. ८/९/१७
पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वतीने वार्षिक प्रशिक्षण शिबीरामध्ये सैन्यदलातील विविध घटकाचे सैन्यज्ञान तीन जिल्ह्यातील छात्रसैनिकांना दिले जात आहे.कमाडिंग ऑफिसर कर्नल रमेश तिम्मापूर यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण शिबीर एनसीसी भवनमध्ये सुरू आहे. अशी माहिती त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदूर्ग आदी जिल्ह्यातील चारशे सैनिकांनी मागील दहा दिवसात सैनिकी ज्ञान घेतले. सद्या एस डी.२०३, जे.डी. 198 चारशे एक छात्रसैनिक ज्ञान घेत आहेत. या शिबीरामध्ये वेपन ट्रेनिंग, ड्रिल ट्रेनिंग, फिल्ड क्राप्ट, बॅटल क्रॉप्ट, लायजल एनसिओ याद्वारे शिक्षण देऊन लायन एरिया कॉम्पीटेशन, क्रॉसकंट्री कॉम्पीटेशन, बेस्ट फायरिंग कॉम्पीटेशन, ड्रिल कॉम्पीटेशन घेऊन छात्र सैनिकांचे मनोधैर्य वाढवून त्यांना प्रशिक्षित केले जाते. दहा दिवसामध्ये उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची गेस्ट लेक्चर आयोजित केले जातात.
या प्रशिक्षणाने छात्र सैनिकांना हत्याराचे ज्ञान मिळाल्याने त्यांना ०.22 रायफल खोलणे जोडणे फायरिंगकरणे ज्ञात होते. ड्रिल प्रशिक्षणाने त्यांना संचलन आणि विविध संचलाचे प्रकार ज्ञात झालेने दिल्ली परेडपर्यंत मजल मारता येते. सैनिक युध्द भूमीवर कशा प्रकारे युद्धाची तयारी करून लढतात त्याचेही बेसिक ज्ञान मिळते. विविध खेळांचे बेसिक ज्ञान प्राप्त होते.एनसीसीचे एकता आणि अनुशासनाची तत्वे माहित होऊन एकता अखंडता, स्वावलंबन, शिस्त अंगी बानविण्यासाठी प्रशिक्षण शिबीर महत्त्वाचे ठरत आहे.गेस्ट लेक्चरमुळे आपणही उच्चपदस्थ अधिकारी होऊ शकतो हा आत्मविश्वास बाणवतो.
मेजर विश्वनाथ कांबळी, एनसीसी अधिकारी सुधाकर निर्मळे, डॉ.आर.एस. नाईक, राजेश पालकर, विकास कुंभार, डॉ.बी.एल. राठोड, सुभेदार मेजर श्रावण यादव, सुभेदार मोहन सुर्यवंशी, विजय वांगेकर, हरी गावडे, राजाराम पाटील, अशोक, बांभूगडे, नायब सुभेदार अरविंद सिंग, बी.एच.एम.बाजीराव माने, सी.एच.एम. संजय मांगले, राजकिशोर, हवालदार भरत पाटील, गणेश मोरे, मारूती पाटील, कृष्णात यादव, सुनिल बोडके, राजाराम मगदूम, निलेश, संतोष कुमार आदी अधिकारी वर्ग अध्यापन करीत आहेत.
No comments :
Post a Comment