Powered by Blogger.

Wednesday, 6 September 2017

शिक्षकांच्या विविध समस्या मार्गी लावू - किरण लोहार      

No comments :

    कोल्हापूर :      माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठश्रेणी ,निवडश्रेणी सह इतर सर्व समस्या निकषास अधीन राहून सोडल्या जातील. कोणतेही रितसर काम थांबणार नाही तर नियमबाह्य काम केले जाणार नाही असे प्रतिपादन माध्यमिकचे नूतन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी  केले.

            जिल्हय़ातील माध्यमिक शिक्षकांच्या विविध समस्यांसंदर्भात आयोजित स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या  पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते . विविध मागण्यांचे निवेदनही  त्यांना संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आले .

              शिक्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेंदूबरोबरच मनगटावर भविष्यात जास्त भर दिला जाणार असून एनसीसी , विविध क्रीडाप्रकार , सहशालेय उपक्रमांवर जास्त लक्ष केंद्रीत करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यावर आपला जास्त भर राहील, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच शैक्षणिक प्रशिक्षणामध्ये अनावश्यक स्पष्टीकरणापेक्षा मुद्देसूद आणि कृतियुक्त गोष्टींवर जास्त लक्ष देऊन शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी  विशेष लक्ष  देण्यात येईल . कारण शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढला तरच भावी पिढी सक्षम बनेल.

माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना स्वाभिमानी शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी निवेदन दिले.
       याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मिलींद बारवडे, जिल्हाध्यक्ष प्रविण देसाई, सरचिटणीस भाऊसाहेब सकट, जिल्हा कार्याध्यक्ष कादर जमादार, नरेंद्र बोते,संघटक फुलसिंग जाधव, इचलकरंजी शहर कार्याध्पक्ष संजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिपक जाधव, सुरेश कांबरे, कागल तालूका अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष संजय कांबळे, कोल्हापूर शहर अध्यक्ष उस्मान मुकादम, प्राचार्य इनामदार, सचिन कांबळे, शंकर खाडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

          फोटो - माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना शिक्षकांच्या विविध समस्या संदर्भात निवेदन देताना सुधाकर निर्मळे सोबत पदाधिकारी.

No comments :

Post a Comment