Tuesday, 5 September 2017
अजितकुमार पाटील यांचे महिलांसाठी योगासने पुस्तक अत्यंत उपयुक्त सरपंच--विद्याताई गुरव
कोरेगांव--कोल्हापूर महानगरपालिका,प्राथमिक शिक्षण समिती संचलित,राजर्षी शाहू विद्यामंदिर,शाळा क्र. ११,कसबा बावडा,शाळेचे मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी लिहिलेल्या आपल्या प्रदीर्घ अनुभवातून महिलांच्या व विद्यार्थ्यांच्यासाठी लिहिलेल्या, महिलांसाठी योगासने या पुस्तकांचे कोरेगांव केंद्र शाळा,नं१,तालुका- वाळवा,जिल्हा-सांगली या शाळेच्या ग्रंथालयास कोरेगांव चे सरपंच विद्याताई गुरव यांचे हस्ते व आर के पाटील बिगर शेती ग्रामीण सह पत संस्था, कोरेगांव चे उपसभापती,बबन शामराव पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत,शाळेचे मुख्याद्यापक संपत चव्हाण यांचे कडे पुस्तके भेट देण्यात आली.
प्रसंगी सरपंच विद्याताई गुरव यांनी "महिलांनी व त्याच बरोबर शाळेतील विद्यार्थ्यांनी दररोज नियमित योगासने केली तर तुम्हाला कोणत्याच औषधाची गरज लागणार नाही. एकाग्रता, स्मरणशक्ती वाढण्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज योगासने करावीत".असे प्रतिपादन सरपंच विद्याताई गुरव यांनी केले.प्रसंगी
अजितकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना व महिलांना "सध्याच्या धावपळीच्या जगात महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत.योगासनाबरोबर समतोलआहार सुद्धा महत्वाचा आहे.रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी योगासन अत्यंत महत्वाची आहेत. कुटुंबातील सर्वांनीआरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे"आरोग्याकडे दुर्लक्ष न करता फक्त एक तास योगासने, प्राणायाम,सूर्यनमस्कार,चालणे,यासाठी वेळ द्यायला पाहिजे तरच आपण सुखी व आरोग्य संपन्न जीवन जगू शकतो.असे विचार प्रकट केले. मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांचा सत्कार कोरेगांव चे सरपंच विद्याताई गुरव यांचे हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी कोरेगांवातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाटील,संजय पाटील,रमेश गुरव,कृष्णात पाटील,भागातील पालक,उपस्थित होते.
No comments :
Post a Comment